• Today is: Monday, July 23, 2018

राणीच्या ‘हिचकी’चा ट्रेलर रिलीज

NextGen News
December20/ 2017

अभिनेत्री राणी मुखर्जी बरेच दिवस रुपेरी पडद्यापासून दूर राहिली होती. पण आता पुन्हा एकदा राणी मुखर्जी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. राणी मुखर्जी ‘यशराज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘हिचकी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीतरी वेगळे कथानक प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचे नाव पाहता येणार अशीच अनेकांची अपेक्षा होती. राणी मुखर्जी प्रेक्षकांच्या याच अपेक्षांची पूर्तता करण्यात यशस्वी होणार असे चित्र ट्रेलर पाहिल्यावर दिसत आहे.

हा ट्रेलर यशराज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन लाँच करण्यात आला आहे. ‘उचकी’चादेखील आजार असतो याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. या चित्रपटाची कथा tourettes syndrome नावाच्या या आजाराच्या भोवती गुंफण्यात आली असून, ती मोठ्या कलात्मकपणे रुपेरी पडद्यांवर मांडण्यात आली आहे.

big banner