• Today is: Saturday, July 21, 2018

दोन फ्रंट कॅमेरेवाले सॅमसंग गॅलेक्सी ए ८, प्लस लाँच

NextGen News
December20/ 2017

सॅमसंगने त्यांच्या ए सिरीजमधील दोन नवे स्मार्टफोन युरोपिय बाजारात लाँच केले असून गॅलेक्सी ए ८ व ए ८ प्लस या नावाने हे फोन आले आहेत. ब्लॅक, आर्किड ग्रे व ब्ल्यू रंगातील या फोन्सच्या किंमती अनुक्रमे ३८ हजार व ४५ हजार रूपये आहेत. जानेवारी २०१८ पासून या फोन्सची विक्री सुरू होत आहे मात्र भारतीय बाजारात हे फोन कधी येणार हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

ए ८ साठी ५.६ इंची फुल एमोलेड स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी व ३ हजार एमएएच बॅटरी दिली गेली आहे तर ए ८ प्लससाठी ६ इंची फुल एमोलेड स्क्रीन, ६ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी व ३५०० एमएएच जी बॅटरी दिली गेली आहे. दोन्ही फोन अँड्रईड नगेट ७.१ व रन करतात. या दोन्ही फोनसाठी ड्यूल फ्रंट कॅमेरे आहेत. पैकी प्रायमरी १६ एमपीचा तर सेकंडरी ८ एमपीचा आहे. रियर कॅमेरा १६ एमपीचा आहे. दोन्ही फोनची मेमरी मायक्रोकार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधाही दिली गेली आहे.

big banner