• Today is: Monday, July 23, 2018

अक्षयच्या ‘टॉयलेट’वर बिल गेट्स यांची स्तुतीसुमने

NextGen News
December20/ 2017

यंदा अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश देणारा चित्रपट म्हणून चांगलाच गाजला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. आता तर अक्षयच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’वर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही स्तुतीसुमने उधळली आहेत. २०१७चे विश्लेषण करताना बिल गेट्स यांनी अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

या वर्षभरात आपण कोणत्या गोष्टींमुळे प्रभावित झालो, याची माहिती बिल गेट्स यांनी ट्वीट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, चित्रपटाचे कौतुक केले. २०१७ हे वर्ष खडतर होते, यात शंका नाही. पण या वर्षानेही काही आशा आणि प्रगतीचे अद्भुत क्षण दिले. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा बॉलिवूडचा चित्रपट, नवविवाहित दाम्पत्याची प्रेमकहाणी आहे. स्वच्छतेबाबत या चित्रपटातून जनजागृती करण्यात आली असल्याचे ट्विट असं बिल गेट्स यांनी केले आहे.

 

big banner